Sunday, January 1, 2012

 तो: उठ गं ये वेडू.....
 बघ तरी बाहेर सकाळ झाली.
 ती: माहितीय रे मला...पण माझी झोप राहिली.
 शी बाबा....का हि सकाळ झाली?
 तो: सांगणार नव्हतो तुला.....
 पण आता सांगूनच टाकतो...
 एकदाचं माझं मन हलकं करून टाकतो....
 ऐक,
 "चंद्राचं सुख सूर्याला काही पहावलं नाही,
 तुला पाह्ल्याशिवाय त्या वेड्याला काही राहवलं नाही,
 तुझे झोपेतले सुंदर रूपच पहायचे होते त्याला,
 पण स्व:तच्या प्रकाशाचा विसर पडला होता त्याला....
 उतावळा तो बिचारा....त्याची हि घाई घाई झाली,
 ह्या सगळ्या फंदात हि सकाळ झाली...."
 ती : हो का ?
 तो : हो....
 पण मी त्या सूर्यापासून अजून काही तरी लपवले आहे.....
 "उगाच तो बिचारा आशा करतोय ....
 कारण त्याला हे माहीतच नाहीयेय...
 त्याचा प्रकाश जितका लक्ख आहे,
 माझा तुझ्यावर तितका नाही पण त्याहून जास्त हक्क आहे...
 (शब्द नव्हते तिच्याकडे......ती फक्त लाजली)

No comments:

Post a Comment