प्रेमच होत ना ग ते?
उद्याचं कुणास ठाऊक काय होईलपण तुझा राग म्हणजे एक प्रेमाचाच भाग
असंच मी प्रत्येक वेळेला गृहीत धरायचो
आठवतोय तुला तो क्षण डोळ्याखालची पापणी
तू हातात घेऊन हळूच फुंकर मारताना
माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना
चल गं असं नसतच मुली
असं मी हळूच पुटपुटायचो
मग तुझे गाल फुगायचे
उगाच माझ्यावर रुसायचे
मी कान पकडून माफी मागायचो
त्यावर तू हलकसं हसायचीस
हातात हात धरून स्वप्नं रंगवायचीस
म्हणायचीस,
आपण कधी वेगळे होऊच शकत नाहीरे
आणि आज तू कुठेतरी दूरवर जाऊन बसलीस माझ्या नजरेआड
मी मात्र एकटा थकलोय आता वाटपाहून तुझी या गजाआड
तुझ्याविना माझ हे चार भिंतीतलं आयुष्य म्हणजे
करावासच ना?
आज तुला साधी माझी विचारपूस हि करावीशी वाटत
नाही
म्हणून मला एक प्रश्न पडलाय ज्याचं उत्तर फक्त तूच देऊ
शकतेस
प्रेमच होतं ना ग ते?
सांगना, नक्की प्रेमच होतं ना ग ते?
No comments:
Post a Comment