Sunday, January 1, 2012

का बोलावे तुझ्याशी ?
कुठे पर्वा आहे तुला माझ्या मनाची
 तुझ्या माझ्या विचारात तफावत कमालीची
 माझ्या साठी प्रेम म्हणजे मंदिराचा कळस
 ... ... तुझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त कोरा कागद

 रोजचेच वाद आणि रोजच्याच कुरबुरी
 कधी तरी थट्टा मस्करी नाही तर रोजच सॉरी
 रोजच एकमेकांचे मन दुखवायचे
 परत स्वतःच वाईट वाटून घ्यायचे


 रोज वचन द्यायचे साथ नाही सोडणार
 आणि दुसर्याच क्षणी सांगायचे तुझे माझे नाही पटणार
 या सगळ्या वादात मानसिक त्रास आणि दुरावा
 घरच्यांना काळजी आणि करियर ची बरबादी
 असले प्रेम काय कामाचे ज्याने भविष्य बिगडेन
 सगळ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरेन

 थोडा होईन त्रास आठवणी विसरायला
 पण हीच वेळ आहे ठाम उभे राहायला
 अजून खूप क्षितिजे आहेत पार करायला
 अजून खूप प्रेम मिळेल नाती टिकवायला
 

आता मागे वळून नको पाहू
 कोणाची चूक नको विचारू

 झाले गेले सगळे विसरून नवीन वाट घे चालायला
 समोर बघ लक्ष लक्ष दिवे असतील तुझ्या स्वागताला

No comments:

Post a Comment