Thursday, May 26, 2011

आई हा एक शब्द.... AAi Ha Shabd


आई हा एक
शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते
अशक्य!!

तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..

आई
म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे
वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......
मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब
आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार
आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली
माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे

No comments:

Post a Comment