Wednesday, July 6, 2011

तिला कधी समजलंच नाही Tila kdhich Samzal Nahi

क्षण . . .?
तिला  कधी समजलंच  नाही
माझं  अवखळ  मन ..
ती  हसायची ...
म्हणायची ... Dialoge मारतो . .
...
असेलही माझ  बोलणं  कदाचित . .
Dialoge   सारखे वाटणारे    ..
पण  त्या  भावना ?
त्या निश्चित खरया होत्या.........
तिचा  आवाज 
मला  फार   आवडायचा  ...
ऐकताना   अंगावर  मोरपिसाचा भास व्हायचा  . . .
ती  मात्र  हसायची  ...
हि.. हा.. हा . .
मी  मात्र  माझं  मोरपीस  जपायचो . .
तिची  द्विधा  असेल  कदाचित ...
पण  मी  प्रत्येक  क्षण  साठवायचो . .
हृदयाच्या  खोल  कुपीत ..
मोरपिसासाहित . . .
ती  गडबडली  ...
जाणे का रुसली  ...
न बोलताच  अंतरली ...
मी मात्र  कोसळलो  . .
गहिवरलो... व्याकुललो..
मोरपिसाचा भासही  मग   ..
आठवतच  धडपडलो  ..
ती मात्र शांत  तशीच ..
स्थितप्रज्ञ ,अज्ञ जशी .. .
मी आहे अजूनही आशेत  ..
मोरपिसाच्या . .
तिला खरच का कळलं नाही  
माझं अवखळ  मन ..?
मी मात्र जपलेत अजून
ते मोरपिसी क्षण . . .

No comments:

Post a Comment