Wednesday, July 6, 2011

एक Boyfriend हवा होता....... Ek Boyfriend Hava Hota

एक Boyfriend हवा होता.......
एक बॉयफ्रेंड हवा होता...
बाहेर खुप शांत असणारा...
...
पण माझ्याबरोबर असला की मात्र मनसोक्त बोलणारा....
एक बॉयफ्रेंड हवा होता....
स्वतःची काळजी नसणारा...
पण मला मात्र स्वतःच्या जीवाहुन जपणारा....
एक बॉयफ्रेंड हवा होता......
नेहमीच बिझी असणारा......
पण मला भेटायला मात्र कसाही वेळ काढणारा.......
एक बॉयफ्रेंड हवा होता......
स्वतःच्याच मस्तीत जगणारा.......
पण माझ्यासाठी मात्र चंद्र-तारे तोडणारा.......
एक बॉयफ्रेंड हवा होता.......
खूप कंजूस असणारा........
पण माझ्या शोपिंगचा खर्च मात्र स्वतःहून करणारा........
एक बॉयफ्रेंड हवा होता....
सांभाळून गाडी चालवणारा......
पण मी सोबत असली की मात्र वाऱ्याच्या वेगात पळवणारा.........

No comments:

Post a Comment