Wednesday, October 5, 2011

कदाचीत प्रेम म्हणजे.......... Prem Mhanje...

कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
 का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

 कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
 शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले
 ...
 कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
 आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला

 कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
 ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर......

 पण आता कळतयं....
 प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे
 आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणे..........

No comments:

Post a Comment