Wednesday, May 25, 2011

मैत्री कधी ठरवून होत नाही Maitri Kadhi Tharvun HOt nahi


मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर
तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....
एकमेकांत येऊन रस्ते
मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि
नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...
नंतर जवळ येतो
एकमेकाला
आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि
आनंदाचे क्षण साजरे करतो...
मैत्री अशी होते..!
काय जादु असते
मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते
आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री
भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...
कधी कधी वाटतं
समुद्राच्या
काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात
खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद
उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....

No comments:

Post a Comment