कधी कधी मित्रा तू माझ्याकडून दुखावला जात असतोस,
पण कसे समजावू तुला,
असं करताना मला किती त्रास होत असतो
तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे,
मित्रा तू तर माझा जीव की प्राण आहेस
तुझ्यासाठी त्याग करायला मला काहीच वाटत नाही,
कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे
तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच असह्य आहे,
तू म्हणशील तर आयुष्यावर पाणी सोडायला तयार आहे
आप्ल्या मैत्री आड कधीच काही नाही येणार,
पण, प्रत्येक संकटाच्या वेळी तू विरू आणि मीच जय होणार
No comments:
Post a Comment