त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती...
त्या रात्री वेगळेपणाची जाणीव पूर्णपणे सरली होती ...
उरले नव्हते कुठलेही पाश, न उरली कुठलीही आस ...
वाटले मिटून घ्यावे डोळे ... तू असता असे पास ...
भरून घ्यावा तुझा गंध ... जपून ठेवावा तुझा स्पर्श
असाच होत राहावा दोन मनाचा दोन देहाचा परामर्श ...
अचानक स्वप्न भंगले अन दिसली रिकामी उशी ...
तुझ्याही शेजारी असेल का ग ती तशी ?
नकळत माझ्या डोळ्याची कड पाणावली ...
असेल का ग तुझीही उशी अशीच ओली?
विषय बदलावा म्हणून कूस बदलली ...
अन ह्या सगळ्यातच अजून एक रात तशीच सरली
No comments:
Post a Comment