Saturday, August 6, 2011

जीवन. Jivan

रोज-रोज नवीन परीक्षा देण काही संपत नाही अन
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.
देता येईल जेवढे, तेवढे दु:ख देत गेले
नेता येईल संगे, तेवढे हसू घेऊन गेले
देण्या-घेण्याच्या व्यवहाराचा ताळमेळ काही बसत नाही
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.
अश्रू देणारयांची बेरीज दिवसेंदिवस वाढत गेली
प्रेमळ शब्दांची संख्या त्याहून दुपटीने घटत गेली
बेरीज-वजाबाकीची ही पद्धत काही बदलत नाही
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.
वर्ग करता अपेक्षांचा घनमूळ होई स्वप्नांचा
भागिले करण्या जाता, गुणाकाराच होई अश्रूंचा
उत्तरेही रोजच बदलती, स्थिर काही राहत नाही
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.

No comments:

Post a Comment