Wednesday, July 6, 2011

एक परी दिसली.............Ek Pari Disali

एकदा मला आकाशात एक परी दिसली
हसली बघून माझ्याकड़े
म्हणते कशी मला.....
माग काय हव ते
मी म्हणाले...
सुन्दर आयुष्य दे मला
जिथे असेल फ़क्त सुख
नसेल कोणतही दुःख
ती म्हणाली देते
पण परत तक्रार नाही करयाची....
अणि झाल ही तसच
सुख सुख अणि नुसत सुख
ना घरात जागा ना मनात...
सुख कुठेच मावेना
शेवटी अश्रु आले डोळ्यात
माझ रडू ऐकून
परी आली धावून
म्हणते कशी सुखात का रडतेस?
तिला काय सांगायाच तेच कलेना
सुखच दुखते आपल्याला तेच उमगेना..
तीला म्हणले तुझ सुख घे
थोडस का होईना मला दुःख दे
दुख शिवाय काय किमत सुखाची....
कडू अणि गोड दोन्ही चव चाखु देना आयुष्याची

Sunday, July 3, 2011

प्रेम म्हणजे नक्की काय…….(Prem mhanje nakki kay)

प्रेम म्हणजे नक्की काय…….


मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?

मी त्याला सागितले की,

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम...

माझ्यावाचून जगशील का..?( Mazya vachun jagshil ka )


तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राह...शील का...?
हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...?
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?
गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...?
...ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का.....

Friday, July 1, 2011

साले हे मित्र असतात बाकी मस्त

"काय आयटम चाललीय बघ......!!!!!!!!"
"वहीणी आहे तुझी स...ाल्या,दुसरीकडे बघ...."

हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं

पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं
निर्लज्ज असतात ते,त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

शाळेचा result असो या प्रेमाचा,ह्यांचाच धिंगाना जास्त
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं
पण काहीही म्हणा,
साले हे मित्र असतात बाकी मस्त

प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं.
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं
breakup नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

प्रेमाचे नाही वाजले तरी मत्रीचे नाणं नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा

दुसरी मुलगी शोधतो आहे ♥

तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे ♥
एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील
तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो
तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे
आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे
तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे
अरे हो…
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल
तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे
तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील
म्हनुन मला माझे
सर्व तु परत कर

स्वप्न थांबवलीत

स्वप्न थांबवलीत कीआयुष्य थांबते।


विश्वास उङाला की आशा संपते।


काळजी घेणे सोङल...कि प्रेम संपते।


म्हणुनच स्वप्न पाहा
विश्वास ठेवा आणि
काळजी घ्या
आयुष्य खुप सुदंर आहे,

स्वप्न

स्वप्न पाहण्यासाठी 1 रात्र सुध्दा जास्त असते,पण स्वप्न पूर्तीसाठी1आयुष्य सुध्दा कमी असते,देव देताना इतकं देतो की कुठे ठेवावं सुचत नाही,अन घेताना इतकं घेतो की जगावं की मरावं हे सुचत नाही...!