Sunday, January 20, 2013

प्रेम

असेल का कुणी ???
मला स्वतःपेक्षा जास्त जीव
लावणारं,

ठेचं लागता मला पटकन
सावरणारं .....

मी रागात असता,
मला प्रेमाने समजून घेणारं .....

असेल का कुणी ???
माझ्या सोबत आयुष्यभर,
प्रेमाने चार पावलं चालणारं .....

मी सुखात आणि दु:खात असताना,
नेहमी मला हक्काची साथ देणारं .....

असेल का कोणी ???
माझ्या प्रेमळ जीवाला,
नेहमी जिवापाड
जपणारं .....

मरण माझ्या समोर असता,
जिवाची पर्वा न करता मला वाचवायला येणारं ......

असेल का कोणी ???
माझ्या सोबत आयुष्यभर जगणारं,

माझ्या सोबत मरणालाही पत्कारणारं .....

असेल का कोणी ??
असेल का कोणी ??

प्रेम


आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती सोबत कुणाची हवी असते.
पण,असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी
असते तेव्हा ती जवळ नसते?
असे म्हणतात की प्रेम शोधुन सापडतं
नसते,
प्रेम हे न कळत होऊन जाते.
मग तरी देखील प्रत्येक व्यक्ती प्रेमा
च्या शोधात का असते ?

Wednesday, December 26, 2012

खर प्रेम


Its OnLy 4 . . . ! ! !
खर प्रेम आता फक्त आढवणीतच उरलं
जेव्हा मी मागे वळुन पाहिल तेव्हा मला जाणवल. . . . . . . .
मी जेव्हा तुला पाहिल तेव्हा मला एका क्षणात समजलं
म्हणतात ना खरं प्रेम हे कधीच लपत नसत
... तु मला कधिच सांगितलं नाही
पण मला तुझ्या डोळ्यात ते नेहमीच दिसलं . . . .
प्रेमाच नातं हे आपुलकीच असतं
ते फक्त प्रेम करणार्याला समजतं . . . .
प्रेम तर कधिच कळत नाही . .
ते तर हळुच मनाला स्पर्श करतं. . .
मी जिवापाड प्रेम केल
तुझ्यासाठी मी हे आयुष्य जगलो
तुला कधीच काही बोललो नाही.
तुझ्यासाठी फक्त मी
माझे जगणं पण तुझ्या नावे केल . .
आता काहिच नाही माझ्याकडे उरलं.
तु सोडुन गेली अन् हळुवार डोळ्यातुन पाणी तरलं
आता काहीच नाहि राहिल .
तुझ्या फक्त आठवणीतच उरलं . . .
खरं प्रेम जे तु पाहिलं,
ते मी नेहमी तुझ्यावर केले . . . .
पण खरं प्रेम आता फक्त आढवणीत उरलं .

Sunday, December 16, 2012

तू म्हणशील आता बस,


तू म्हणशील आता बस,
तू आहे फक्त एक त्रास,

तू म्हणशील आता बस,
तू आहे फक्त एक त्रास,
...

तरीसुद्धा तुझ्या परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेयीन मी शेवटचा श्वास

Sunday, December 2, 2012

प्रेम ... Prem

एकदा मला विचारले
तू मला नेहमी तुझ्याच हृदयात ठेवशील
ना?
जसं मी तुला माझ्या हृदयात ठेवलं आहे तसं
तेव्हा मी म्हणालो ,
 .
 .
जर तुला बघायचच आहे माझं तुझ्यावर
किती प्रेम आहे
तर मी सांगतो तसं कर,
 .
तुझे डोळे बंद कर
आणि ज्याचा चेहरा तुला दिसेल तो मीच असेन
तुझा हाथ तुझ्या हृदयावर ठेवून प्रत्येक
हृदयाच्या ठोक्याला मेहसूसकर, तो प्रत्येक
हृदयाच्या ठोका नेहमी माझ्यासाठी धडकत असेल

जेव्हा तुझ्या आयुष्यात कधी खुशीचा क्षण येईल,
तेव्हा पहिला व्यक्ती जो खुशीचा क्षणात
सामील असेल तो मीच असेन

जेव्हा तू कधी दुखी असशील
आणि तुला रडावसं वाटत असेल,
तेव्हा तुझ्या भावनांना वाटून
घेण्यासाठी आणि तुला दुखात
हसवण्यासाठी मीच असेन

जेव्हा तू आयुष्यात कधी कठीण परीस्तीत
असशील,
तेव्हा फक्त मला मनापसून हाक मार,बघ
मी तुझ्या जवळच असीन

.......जेव्हा तू हे जग सोडून जाशील,
तेव्हा फक्त आपल्या बाजूला बघ
मी तुझ्या सोबतच असेन....♥♥

Tuesday, November 27, 2012

ही अखेरची तुझी आठवण


ही अखेरची तुझी आठवण

ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही ...
...

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही .....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही ....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर ...!

म्हणूनच , हे अखेरचे काही अश्रू ,
फक्त तुझ्यासाठी ...
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत ...

आणि हे अखेरचे काही शब्द ,
फक्त तुझ्यासाठी ...

पण यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार् नाहीत ...

यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार् नाहीत ...

ही अखेरची तुझी आठवण ...
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार् नाही ...!

कुणी असे भेटावे...... Kuni ase bhetave.

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

ज्याला आपल्या मनातले
सर्व काही सांगावे,

सांगता सांगता आयुष्य
पूर्ण सरुन जावे,

आणि सर्तानाही आयुष्य
...

पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

ज्याला घेऊन सोबतीने
खूप खूप चालावे,

चालता चालता दूरवर
खूप खूप थकावे,

पण थकल्यावरही
आधारसाठी त्याच्याकडेच
पहावे........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

दुख त्याचे आणि अश्रू
माझे असावेत,

सोबतीने त्याच्या
खूप खूप रडावे,

आणि अश्रूंच्या हुंदक्यात
सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

आनंद त्याचा आणि हसू
माझे असावे,

त्याच्यासाठी मी जगतच
राहावे, जगतच राहावे,

आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून
जावे.......

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

ज्याच्या सोबतितल्या
प्रत्येक क्षणाने सुखवावे,

उन्हात त्याने सावली तर
पावसात थेंब व्हावे,

आणि मायेच्या थेंबानी मी
चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

सूर त्याचा आणि
शब्द माझे असाव........... ..!!!