Monday, June 6, 2011

साजन दिसावा

स्वप्नी माझ्या मज साजन दिसावा.
खोडी काढून गोड गाली हसावा.
धरेन तयासी मग लटका रुसवा.
जाईन दूर टाकून कटाक्ष फसवा.

भ्रमरापरी तो येईल मागुन.
लपेन मी फुल अन वेलीं मधुन.
घमघमेल चारी बाजुनी गंध.
हळुच मागुन नयन करेल बंद

उगा-उगा झोंबेन सोडवण्या मज.
सर्वांगातून झंकारेल मधुरसा साज.
वाटे मज हृदयाशी घट्ट तयाने धरावे.
ओठांनी अमृताचे प्याले रिते करावे.

तनु तयाच्या सदा विळख्यात रहावी.
अजंठाची ती युगुल मूर्तच भासावी.
क्षणा- क्षणाचे एकेक युग व्हावं.
प्राण प्रियाचं स्वप्न आता सत्यात यावं.
प्राण प्रियाचं स्वप्न आता सत्यात यावं.

No comments:

Post a Comment