मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस............?
चंद्रासाठी चांदणी तू
अन् सागरासाठी किनारा आहेस
बोलून चालून मैत्रीण तू माझी
मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस
आहेत अनेक मित्र सागराच्या लाटांपरी
किनार्याला भिडणारी तू एकच लाट आहेस
बोलून चालून मैत्रीण तू माझी
मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस
भर पहाटे बालकनित घेतलेल्या
दीर्घ श्वासपारी तू आहेस
बोलून चालून मैत्रीण तू माझी
मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस
सारखे तुझ्यासोबत ह्सावसे वाटते
सांग काय करू मी ?
फुलपाखरांच्या पंखावरील काहीसे ते रंग
तू त्या हस्याने चोरून घेतले आहेस
बोलून चालून मैत्रीण तू माझी
मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस
बालपण आजुनी तुझे गेले नाही
मोठेपण कदाचित तुला मिळणार नाही
तू थोडी नाही, जरा जास्तच वेडी आहेस
बोलून चालून मैत्रीण तू माझी
मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस
डोळे मिचकावत चंद्र एकदा हसला होता
त्या दोन चांदण्यानसोबत सजला होता
त्या मोहक हस्यापरी जाणीले मी इतुके
कुठेतरी तुही हर्षात नाहत आहेस
बोलून चालून मैत्रीण तू माझी
मग हृदयाच्या एवढ्या जवळ का आहेस.
No comments:
Post a Comment