पुन्हा तोच पाउस कालचा
पण आज नव्याने आलेला,
कालही तोच होता
पण आज परका झालेला,
काल होता आपलासा वाटणारा
...भीजउन गेला तरी सुखाऊन टाकणारा,
आजही तोच आहे
पण खूप नवीन झालेला,
काल होता तेव्हा ती होती सोबतीला
आज मात्र एकट्याला भीजउन गेलेला,
कालच्या पावसात भिजायचं होत ,
आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत,
आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत....
No comments:
Post a Comment