Sunday, June 19, 2011

एक हुशार माणू

एक हुशार माणूस काही माणसांच्या घोळक्यात बसला होता.असेच बोलता बोलता त्याने एक छानसा विनोद केला. सर्व जण खूप वेळ पोट धरून हसत होते. थोड्यावेळाने त्या हुशार माणसाने परत तोच विनोद केला. ह्या वेळेला थोडे कमी लोक हसले. त्या हुशार माणसाने परत परत तोच विनोद केला आणि शेवटी त्या घोळक्यामध्ये कोणीच हसले नाही.

तो हुशार माणूस हसला आणि म्हणाला.

जर तुम्ही एका विनोदावर सारखे सारखे हसू शकत नाही तर तुम्ही एखाद्या गोष्टीचे दु:ख करत सारखे सारखे रडत का बसता ?

आयुष्यातला वाईट गोष्टी विसरा आणि पुढे चालत राहा…

No comments:

Post a Comment