प्रेमात ब्रेक - अप आमच्या वाट्याला कधी आलाच नाही .....
ब्रेक - अप होण्याइतक प्रेम कधी कोणावर केलच नाही ......
तिच्याबरोबर हसलो खेळलो नाचलो पण प्रेमात पडलो नाही .......
तिच्यावर कविता लिहिल्या पण आय लव्ह यु म्हटलं नाही .........
तिच्या लग्नातही आम्ही नाचलो किंचितही थकलो नाही .......
त्यानंतर ही आमच ब्रेक - अप झाल कधी म्हंटल नाही ........
ब्रेक - अप होत ते माझ्या मते प्रेमच नाही .....
ब्रेक - अप करणाऱ्याना कदाचित प्रेमच अजून कळल नाही ...........
त्यागावर आधारित प्रेम आज कोणी करतच नाही .........
स्वार्थासाठी ब्रेक - अप पण प्रेमासाठी प्रेम कोणी करतच नाही
No comments:
Post a Comment