Sunday, June 19, 2011

पाण्याने भिजलेली … (Panyane Bhijleli)


पाण्याने भिजलेली …
थंडी ने शहारलेली …
विजांच्या कडकडाटाने घाबरलेली …
पावसाच्या थेंबांनी नटलेली …
ओलाव्याने सजलेली …
छत्रीत लपलेली …
चिखलावर थोडीशी रागावलेली …
पण वार्याने सुखावलेली …
दगडा दगडावर पाय टाकत चाललेली …
स्वतः ची स्वतःच सावरलेली …
खोटी खोटी रुसलेली …
थोडीशी लाजलेली …
माझ्याशी हसलेली …
जोराच्या पावसात ….
काळ्या ढगांच्या काळोखात …
छत्र्यांच्या गर्दीत ….
खरंच ती …
ती फार …. सुंदर दिसत होती …....माझी मैत्रिण....

No comments:

Post a Comment