Sunday, April 15, 2012

वेळ असेल तुला तर
एकदा मला भेटशील का ?
दोन शब्द बोलायच होत
थोड ऐकून घेशील का

...पहिला तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचास

तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढ़ायचास

काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास

दिवस भर माझ्याशी
कट्टी फू करायचास
आता कशाला आमची गरज पडेल
अस सारख चिडवायचास

माझा चेहरा पडला तर
खुप नाराज होयचास
हळूच जवळ घेउन
सॉरी बोलायचास

आज ही मला तुझा
सारखा होतो भास्
कारे असा वागतोस
का देतोस त्रास

नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास.

No comments:

Post a Comment