Showing posts with label प्रियकर. Show all posts
Showing posts with label प्रियकर. Show all posts

Sunday, November 6, 2011

असा असावा माझा प्रियकर ... Asa Asava Maza Priyakar

असा असावा माझा प्रियकर ...
 भ्रमरासारखा गुंजन करणारा ,
 गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,
 मनातल त्याच्या निरागस बोलणारा ,
 सतत हसणारा अन दुस-यांना हसवणारा ,
 दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,
 त्याच्या प्रेमाने मोहून टाकनारा ,
 त्याच माझ्यावरच प्रेम पाहून दुस-
 यांना हेवा वाटेल अस राहणारा ,
 वसंताताल्या श्रावनाप्रमाने भासणारा ,
 अन मुसलधार पावसात प्रणयधुंद होणारा ,
 माझ्या मनातल ओळखून मला समजणारा ,
 माझ चुकलेल पावुल सावरणारा ,
 माझ्या बडबडीवर रागावनारा अन हसणारा ,
 माझ्या डोळ्यातून वाहणार
 पानी त्याच्या ओठाने टिपनारा,
 आपलस करून सोबत चालणारा ,
 सुख दू:खात सावलिप्रमाने राहणारा,
 असा असावा माझा प्रियकर....
 माझ्यावर खूप प्रेम करणारा