Monday, June 13, 2011

प्रेमळ (Premal)


आवाजापेक्षा प्रेमळ डोळे ,
डोळ्यांपेक्षा प्रेमळ श्वास,
श्वासापेक्षा प्रेमळ काळीज,
काळजा पेक्षा प्रेमळ तू
आणि,,
तुज्यापेक्षा प्रेमळ मी ,
कारण Massage मी लिहिला आहे ना..
.

Love YOu Selena..
♥ ♥ प्रिये, एके दिवशी माझ्या आयुष्याच्या पुस्तकाची पाने संपून जातील,
पण जर मला ती पुन्हा वाचायला मिळालीना तर मी
त्या पाना पासून वाचायला सुरुवात करेन जेथे आपण भेटलो होतो
............. ♥ कारण तू माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर भाग आहेस. ♥

वाट.............Vaat


वाट.............
रस्त्येवर चलनारेंची
दोन वाटाणा जोडनेची
नवा रुतु बहरान्येची
उज्वला भविष्य घडन्येची....
वाट ................
प्रेमळ छायेची
मनाताल्ये स्वप्नाची
त्ये कोमल शानांची
जुलानार्ये नविन नत्येची ......
वाट...........
गोड़ चाहुलीची
एवालेश्ये पावलांची
बोबद्ये बोलांची
'आई ' ही हाक येकन्येची.............
वाट.............
शेवटचे शानांची
तुज्ये मिठीत विसवान्येची
सात जन्मच्या वाचनाची
मोश्क पर्प्तिची ................

ही वाट कधी न संपणारी........

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुनबाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो



Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचोCafé बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे
त्याच्याआधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण
आठवले की डोळ्यात चटकन् पाणि येतं………….

पाण्याचा थेंब...(Panyacha Themb)


पाण्याचा थेंब...

कमळाच्या पानावर पडला तर चमकतो,

गरम तव्यावर पडला तर वाफ होवून अनंतात विलीन होवून जातो,

शिंपल्यांत पडला तर मोती होतो,

थेंब तोच फ़रक़ फ़क़्त सहवासाचा असतो...........!

Sunday, June 12, 2011

आठवतं तुला ?

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

खरच का ग आई


खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..