Sunday, June 12, 2011

आठवतं तुला ?

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

खरच का ग आई


खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..
असंही प्रेम असतं!!
अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं….

काय करु? काहीच सुचतं नव्हतं…

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात….

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन….

थडगे ताजे वाटत होते….मनात कुतूहल जागले….

थडग्यावरचे नाव वाचले…' महनाज़ खान ' '1982-2008'…

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का… का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले…

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला….

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

…….मी निशब्द….

असंही प्रेम असतं!!
वाट.............
रस्त्येवर चलनारेंची
दोन वाटाणा जोडनेची
नवा रुतु बहरान्येची
उज्वला भविष्य घडन्येची....
वाट ................
प्रेमळ छायेची
मनाताल्ये स्वप्नाची
त्ये कोमल शानांची
जुलानार्ये नविन नत्येची ......





वाट...........
गोड़ चाहुलीची
एवालेश्ये पावलांची
बोबद्ये बोलांची
'आई ' ही हाक येकन्येची.............
वाट.............
शेवटचे शानांची
तुज्ये मिठीत विसवान्येची
सात जन्मच्या वाचनाची
मोश्क पर्प्तिची ................
ही वाट कधी न संपणारी.............

पुन्हा तोच पाउस कालचा

पुन्हा तोच पाउस कालचा

पण आज नव्याने आलेला,

कालही तोच होता

पण आज परका झालेला,

काल होता आपलासा वाटणारा

...भीजउन गेला तरी सुखाऊन टाकणारा,

आजही तोच आहे



पण खूप नवीन झालेला,

काल होता तेव्हा ती होती सोबतीला

आज मात्र एकट्याला भीजउन गेलेला,

कालच्या पावसात भिजायचं होत ,

आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत,

आज मात्र आडोश्याला उभं राहायचं होत....

हि आपली वाट नाही ,

जेवा तुझ्या भावांनी मला मसाल्यावानी कुटला ,

बघत होतिस गँलरितुन , दया नव्हती तुला ..

येशिल धावुन वाटलं ,

पण तु घात केला ...

तेव्हा मनात ठरवलं ,

...हि आपली वाट नाही ,

दुसऱ्या गल्लित चला :-)

ती.....

ती.....



कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...

एरवी अगदी खळखळून हसते

पण मी हात पकडला की रागावते डोळे मोठे करते

टि शर्ट आणि लेगिन्स काय काय घालते, असो

पण पंजाबी ड्रेस वर चुकुनही टिकली नाही लावत

मोबाईलमधले फोटो आवर्जुन दाखवते

पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते

लोकांसमोर खुप चिव चिव करते,

मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च बोलते

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते

पण माझा विषय निघाला की पटकन बावरते, विषय बदलते

इतके लिहून पण प्रतिसाद काहीच नसेल,

कोण आहे ती विचारून खुशाल मोकळी होईल


बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगत असते

एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते

हसते अशी ना, मनाला फार फार सुखवून जाते.