Sunday, June 26, 2011

तू माझ्याशी लग्न करशील….????


तू माझ्याशी लग्न करशील….????

एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील…

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण……….
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

ती : "मस्त ना?


ती : "मस्त ना?
पाउस म्हणजे थंड वारा..."
तो : "नाही गं
पाउस म्हणजे चिखल सारा..."
ती : "गप रे....
पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..."
तो : "अगं पाउस म्हणजे..
ट्रेनचे वांदे आणि ऑटोरिक्षाचं भाडं...."
ती : "सुधारणार नाहीस तू
पाउस म्हणजे वेडी सर....."
तो : "हा हा...
पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची भर...."
ती : "पाउस म्हणजे
भिजलेल्या मातीचा गंध..."
तो : "हा हा मातीचा गंध,
पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे,पण office नाही बंद.."
शेवटी ती:-"किती bore आहेस रे तू?
जा मला नाही बोलायचं तुझ्याशी."

हे ऐकून त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितले,
ती गालातल्या गालात सुंदर लाजली अन त्याला बिलगली.
तो म्हणालेला:-"हे बघ,तुझ्यासाठी पाउस म्हणजे जे असेल ते असेल,
पण माझ्यासाठी
"तुच माझी सर,अन तूच माझा पाउस,
फक्त मला कधीहि सोडून नको जाउस."

याला म्हणतात,"सौ सोनार कि,और एक लोहार कि."

रूपारेलमध्ये असताना... (Ruparel madhe astana)


रूपारेलमध्ये असताना...
रूपारेलमध्ये असतानाची गोष्ट
ती मला खूप खूप आवडायची
हसताना गालावर तिच्या
अगदी गोड खळी पडायची

नुसत्या स्पर्शानेदेखील जसं
मिटून जातं लाजाळुचं पान
तशीच तिच्या येण्याची चाहूल
हरपून टाकायची माझं भान

तिचं कॉलेज सकाळचं म्हणून
मीसुद्धा लवकर उठायचो
ती यायची ट्रेनने म्हणून
मीही मग ट्रेननेच जायचो

गणिताचे सर, इंग्लिशच्या मॅडम
सारयासारयात तीच दिसायची
कधी कधी तर वर्गातसुद्धा
चक्क बाजुला येऊन बसायची

लायब्ररीत तर दिवसभर फक्त
ती असायची म्हणूनच जायचो
कधी कधी तर लेक्चर बुडवून
लायब्ररीतच बसून रहायचो

कॅन्टीनमध्ये कधी समोर आली ना
की पोटात खोल खड्डा व्हायचा
डोळे मिटून घेतले तरीही
तिचाच चेहरा समोर यायचा

जातो आताही अधूनमधून
रूपारेलच्या फाटकासमोरून
ती नसते अन नसते तिची चाहून
असतं फक्त भर दुपारचं उदास ऊन..

Sunday, June 19, 2011

प्रेमात पडली होती

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......

मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा
फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो
सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

दुसऱ्या
दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि
ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये
बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....

थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????

.

ती
मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण,
रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ
होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि
त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते

प्रेम तुझं खरं असेल तर

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

प्रेमात ब्रेक

प्रेमात ब्रेक - अप आमच्या वाट्याला कधी आलाच नाही .....
ब्रेक - अप होण्याइतक प्रेम कधी कोणावर केलच नाही ......
तिच्याबरोबर हसलो खेळलो नाचलो पण प्रेमात पडलो नाही .......
तिच्यावर कविता लिहिल्या पण आय लव्ह यु म्हटलं नाही .........
तिच्या लग्नातही आम्ही नाचलो किंचितही थकलो नाही .......
त्यानंतर ही आमच ब्रेक - अप झाल कधी म्हंटल नाही ........
ब्रेक - अप होत ते माझ्या मते प्रेमच नाही .....
ब्रेक - अप करणाऱ्याना कदाचित प्रेमच अजून कळल नाही ...........
त्यागावर आधारित प्रेम आज कोणी करतच नाही .........
स्वार्थासाठी ब्रेक - अप पण प्रेमासाठी प्रेम कोणी करतच नाही

मी तिच्यात नव्हतो

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.