प्रेम करायचे आहे तुझ्या
निरागस त्या रूपावर !
मला पाहून मुरडलेल्या
त्या नकटया नाकावर !!
प्रेम करायचे आहे तुझ्या
नखरेल रूसण्यावर !
निपक्षपाती नदी परी
खळखळत्या हसण्यावर !!
प्रेम करायचे आहे त्या
श्रावणी हिरवळी वर !
हळूच गाली खुलणा-या
तुझ्या मनमोहक खळी वर !!
प्रेम करायचे आहे नवख्या
दिनरात झुरण्या वर !
गुंतुनी स्वप्नी तुझ्याच
वेड्या परी फिरण्यावर!!
प्रेम करायचे आहे
निरपेक्ष नकारावर!
तरी मनात लपलेल्या
तुझ्या मूक होकरावर!!
हळुवार तुझे भाव सखी
माझ्या साठी नसण्यावर !
तरी प्रेम करायचे
तुझे स्वप्नी माझे'च असण्यावर !!
No comments:
Post a Comment