Showing posts with label प्रेम करायचे आहे. Show all posts
Showing posts with label प्रेम करायचे आहे. Show all posts

Sunday, July 31, 2011

प्रेम करायचे आहे...Prem Karayche Aahe


प्रेम करायचे आहे तुझ्या
निरागस त्या रूपावर !
मला पाहून मुरडलेल्या
त्या नकटया नाकावर !!
प्रेम करायचे आहे तुझ्या
नखरेल रूसण्यावर !
निपक्षपाती नदी परी
खळखळत्या हसण्यावर !!
प्रेम करायचे आहे त्या
श्रावणी हिरवळी वर !
हळूच गाली खुलणा-या
तुझ्या मनमोहक खळी वर !!
प्रेम करायचे आहे नवख्या
दिनरात झुरण्या वर !
गुंतुनी स्वप्नी तुझ्याच
वेड्या परी फिरण्यावर!!
प्रेम करायचे आहे
निरपेक्ष नकारावर!
तरी मनात लपलेल्या
तुझ्या मूक होकरावर!!
हळुवार तुझे भाव सखी
माझ्या साठी नसण्यावर !
तरी प्रेम करायचे
तुझे स्वप्नी माझे'च असण्यावर !!