Sunday, November 27, 2011

तू काय देऊन गेलीस........ Kay Deun Gelis(Breakup)


काय मागीतले होते मी तूझ्याकडे,
 अन् मला तू काय देऊन गेलीस.

 सूखाची तहान लागलेली म्हणून,
 थोडं प्रेम मागीतले तूझ्याकडे.
 ... तू माञ मला सागराएवढे,
 दुःख जीवनात देऊन गेलीस.

 तुझ्या सहवासातले थोडसं,
 आयुष्य मागीतले मी तुझ्याकडे.
 तू माञ तुझ्या विरहातलं मला,
 रोजंचच मरण देऊन गेलीस.

 माझ्या चेहरयावरती थोडसं,
 मला हसू मागीतले मी तुझ्याकडे.
 तू माञ माझ्या आसवांना,
 डोळ्यांतच घर देऊन गेलीस.

 आयुष्यभराच्या सोबतीसाठी,
 साथ मागीतली मी तुझ्याकडे.
 तु माञ जगण्यासाठी मला,
 तुझ्या आठवणी देऊन गेलीस.

 माझ्या जीवनामधे तुझ्या प्रीतीचा,
 गंध मागीतला मी तुझ्याकडे.
 तू माञ सरणावरती माझ्या,
 फुले टाकून निघून गेलीस.

 काय मागीतले होते मी तूझ्याकडे,
 अन् मला तू काय देऊन गेलीस.

No comments:

Post a Comment