Wednesday, March 27, 2013

अधूर स्वप्न


अपेक्षा तर काहीच ठेवल्या नव्हत्या
माहीत होत त्या कधीच पुर्ण होणार नव्हत्या
म्हणून त्यांच्या मागेही
कधी वेडी सारखी धावली नाही
पण चूक शेवटी झालीच माझ्या हातून
नाही म्हणता म्हणता शेवटी
एक म्ह्त्वाकांश्या मनाशी बाळगलीच
आणि जे नाही व्हयाच तेच झाल
दूर असूनही जितकं तुला आठवलं नसेल
तितकं तू जवळ आल्यावर तुला शोधलं
एक वेडी अशा व्हती तुझ्या बद्दलची
 जी आता हळूहळू पुसटशी होत आहे
सगळच तर विरळ होत आहे
तुज भेटणं, मला शोधणारी तुझी प्रेमळ नजर
आणि कदाचित आता तुज माझ्यावरच प्रेमही......................
पण, मी हे सगळ नाही विसरू शकत
तू कधी भेटलास नाही तरी ही
आणि तुझी प्रेमळ नजरही
तुझ्या आणि माझ्या
पहिल्या नजरेवर च माझ पूर्ण जीवन अपर्ण आहे

No comments:

Post a Comment