Wednesday, March 27, 2013

प्रेम



आजकाल मला तुला छळायला खूप आवडते,
 चालता चालता उगाच मागे वळून बघायला आवडते,
 मला बघताच तुझ्या हृदयाच्या वाढणाऱ्या ठोक्यांना ऐकायला आवडते,
 आणि हळूच एक स्मित हास्य देवून रोज तुझे काळीज चोरावेसे वाटते...
 खूप काही बोलायचे असते,
 खूप काही ऐकायचे असते,
 तसे तर मला तुला रोजच भेटायचे असते,
 रोजच्या या धावपळीच्या जगात,
 नवीन आयुष्य जगायला शिकायचे असते,
 वेळच अपुरा पडतो रे,
 नाहीतर मला आयुष्यभर तुलाच ऐकत बसायला आवडले असते...♥♥♥

No comments:

Post a Comment