Sunday, April 15, 2012

वेळ असेल तुला तर
एकदा मला भेटशील का ?
दोन शब्द बोलायच होत
थोड ऐकून घेशील का

...पहिला तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचास

तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढ़ायचास

काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास

दिवस भर माझ्याशी
कट्टी फू करायचास
आता कशाला आमची गरज पडेल
अस सारख चिडवायचास

माझा चेहरा पडला तर
खुप नाराज होयचास
हळूच जवळ घेउन
सॉरी बोलायचास

आज ही मला तुझा
सारखा होतो भास्
कारे असा वागतोस
का देतोस त्रास

नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास.

Sunday, April 1, 2012

फुलपाखरांकडून रंगीबेरंगी छटा तुझ्यात येऊ दे,
माळरानावरच्या फुलांचा सुगंध तुझ्यात असू दे.!!

मधुर फळांची रसाळता तुझ्यात न्हाऊ दे,
शांत हिरव्या पानांचा ताल तुझ्यात चढू दे.!!

अश्रूंना त्या गालावर कधीच स्थान नसू दे

वाञ्याचा झंजावात तुझ्या नसानसात भिनू दे,
दिव्याची प्रखर ज्योत तुझ्या मनात तळपू दे.!!

पौर्णिमेच्या चंद्राचे सौंदर्य तुला मिळू दे,
अमावस्येची रात्र मात्र माझ्या वाटेला येऊ दे.!!

आयुष्यातले प्रत्येक सुख तुला अनुभवता येऊ दे,
दुःख मात्र तुझ्या वाट्याचे मला मनात दडवू दे.!!

आनंदाची खळी नेहमीच तुझ्या गालात खिळू दे,
अश्रूंना त्या गालावर कधीच स्थान नसू दे.!!
काही मिळविण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता,
खरच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच वेगळी असते.

आज मी खुप खुश आहे,

आज मी खुप खुश आहे,

कारण ?????

आज मी तीला कायमचा विसरण्यात
... यशस्वी झालो..

आज मी तीची दिवसात फक्त दोनदाचं
आठवण काढली,

एक म्हणजे श्वास घेताना आणि दुसरी
म्हणजे श्वास सोङताना..
---
नाती हि रक्ताचीच नाही: तर
नाती जाणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते .........आणि
जर जाणीव नसेल तर आपली माणसे हि
परकी होऊन जातात...

विसरू शकत नाही..

खूप विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही..

तिच्याशी कितीही बोललो तरीही मन भरत नाही.

का येत असते तिची नेहमी आठवण..

कारण कदाचित माझ्या मनात करून ठेवलीये तिची साठवण.

पुन्हा गेला आजचा दिवस तसाच भांडणात आणि रुसण्यात.

पण खर सांगतो प्रेमात वेगळीच मज्जा असते रुसून बसण्यात.

अजूनही पाहतोय तीच्या एका SMS ची वाट.

जशी रोज वाहून नेते मला ती स्वप्नांची लाट.

इतकच सांगायचय तिला कि जरा अजून काही क्षण पहा माझी वाट.

नक्कीच येयील तो क्षण..आणि त्यात आपण दोघांना वाहून नेणारी प्रेमाची लाट.

तू आहेस मनातल्या मनात

मनात माझ्या तुझीच आठवण
मनात माझ्या तुझीच वाट
मनातच आहे सगळं काही
मनात माझ्या तुझे विचार दाट

... सामावून मी ठेवलंय सगळंच
ह्रिदयाच्या आतल्या आत
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात

शांत तुझा स्वभाव
निरागस तुझे डोळे
स्वप्नं सुंदरी तू माझी
पण विचार तुझे भोळे

पहावी सजून तुला
माझ्या घराच्या अंगणात
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात